Sharad Pawar | मला ‘शरद पवार’म्हणतात,माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही

Sharad Pawar on Sunil Shelke | मला ‘शरद पवार‘ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर (Sunil Shelke) निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या (Lonavala) सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी पवारांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला आहे.

फॉर्म भरताना पक्षाचं चिन्ह आणि नेत्याची सही लागते ती सही माझी असल्याची आठवणही अजित पवार गटाचे सुनील शेळकेंना यावेळी शरद पवार साहेबांनी करून दिली. त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे तुम्हाला निवडणून आणण्यासाठी राबले त्यांनाच तुम्ही दमदाटी करता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा दमदाटी केली तेवढी बास पुन्हा असं काही केलं मला शरद पवार म्हणतात एवढं लक्षात ठेवा. मी या रस्त्याने कधी जात नाही मात्र, या रस्त्याने जाण्याची कुणी स्थिती निर्माण केली तर त्याला सोडतही नाही असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं