कीर्तीकर यांच्या रक्तात भेसळ; कदमांच्या टीकेनंतर शिंदे गटात कलगीतुरा

Ramdas Kadam Vs Gajanan Kirtikar : शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदास कदम यांच्या विरोधात पत्र काढून गजानन कीर्तीकर यांनी रामदास कदम यांना लक्ष्य केले आहे. यावर आता रामदास कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून किर्तीकर यांचे वय झाले असून त्यांना आता चांगल्या उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.

रामदास कदम यांनी म्हटले की, खरंतर किर्तीकर पक्षासोबत गद्दारी करत आहेत. गोरेगाव येथील कार्यालयात वडिलांनी मुलगा एकाच कार्यालयात बसत आहेत. आपला खासदारकीचा निधी मुलाला विकास कामे करण्यासाठी देत आहेत. कदम यांना कसं बदनाम करायचा हे आमच्या पक्षातील एक ज्येष्ठ नेता करत असल्याचे कदम यांनी म्हटले. कीर्तीकर यांच्या रक्तात भेसळ झाली असल्याची टीका त्यांनी केली.

रामदास कदम यांनी म्हटले की, गजाभाऊंचे वय झालेय त्यांना डॉक्टरांची गरज आहे. पक्षाच्या नेत्याविरुद्ध त्यांना पक्ष प्रमुखांसोबत चर्चा करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी थेट निवेदन जारी करत बेछुट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की 1990 मध्ये पाडण्याचा आदेश दिला. त्यावेळी मी कांदिवलीमध्ये एक शाखाप्रमुख होतो. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुखांनी खेड (Khed)मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी केशव भोसले (keshav Bhosale) यांच्यासोबत माझी लढत होती. त्यांना दाऊदचा त्यांना पाठिंबा होता. त्यावेळी दाऊद देशातून बाहेर पळून गेला नव्हता. त्यामुळे माझी लढत दाऊद सोबत होती. माझा संघर्ष तिकडं असताना गजाभाऊंना मालाडमध्ये कशासाठी पाडायला येऊ, असा उलट प्रश्न कदम यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला, ‘असे’ करणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला

IND Vs NED: विराटने केली सचिन तेंडुलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी, बेंगळुरूमध्ये खेळली ऐतिहासिक खेळी

World Cup च्या अंतिम सामन्यात भिडणार ‘हे’ दोन संघ, एबी डिविलियर्सने केले भाकीत