मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या…

तुळजापूर – राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर त्यांनी हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तुळजा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.