दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावत सूर्यकुमारने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय

Suryakumar Yadav Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादवने धमाकेदार शतक झळकावले. त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. सूर्याने केवळ 56 चेंडूंत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 100 धावा केल्या. त्याच्यामुळेच टीम इंडिया मोठी धावसंख्या करू शकली. शतक झळकावल्यानंतर सूर्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी यापूर्वी कोणताही खेळाडू करू शकला नव्हता.

असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला
सूर्यकुमार यादवचे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे चौथे शतक आहे. यासह, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. त्याने रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4-4 शतके झळकावली आहेत. पण सूर्याने चारही शतके वेगवेगळ्या देशांमध्ये झळकावली आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये चारही शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी कोणताही खेळाडू हा करिष्मा करू शकला नाही.

सूर्यकुमारने इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टी20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, रोहित शर्माने भारतात तीन आणि इंग्लंडमध्ये एक शतक झळकावले आहे. ग्लेन मॅक्सवेलने भारतात दोन शतके आणि ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत प्रत्येकी एक टी20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप करून काही अर्थ नाही, समंजसपणे हा प्रश्न मार्गी लावा- जयंत पाटलांचे आवाहन

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; उपमुख्यमंत्री पवारांची ग्वाही