Vijay Vadettiwar | वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते; वडेट्टीवारांचा ठाकरेंना टोला

Vijay Vadettiwar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राज ठाकरे आले आहेत. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी ‘वाघ गवत खायला लागला आहे,’ असा खोचक टोला मनसेप्रमुखांना लगावला.

राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले, त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. आज वाघाची शेळी झाली आहे. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले, हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा