लिंबेवाडी गावची ग्रामपंचायत बॉडी मिळणारे मानधन वापरणार गावच्या विकासासाठी

लिंबेवाडी चा विकास हेच ध्येय - सरपंच किरण चंद्रकांत फुंदे

करमाळा – करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी (Limbewadi in Karmala Taluka) ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, सदस्य यांनी मिळणारे मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे . सरपंचांसह सर्वांना मिळणारे मानधन हे गावची विकास कामे करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती लिंबेवाडी चे सरपंच किरण फुंदे यांनी सांगितले . सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे ..

करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी ग्रामपंचायत अनेक वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे .ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने गावात विकासकामे करण्यासाठी सरपंच किरण चंद्रकांत फुंदे यांसह उपसरपंच ,महादेव पांडुरंग फुंदे तसेच सिंधु बाळासाहेब जायभाय (सदस्य) बाळासाहेब अंकुश जायभाय (सदस्य) ,अंजना भास्कर सानप (सदस्य) ,गोदाबाई रामभाऊ गोरे (सदस्य),मनिषा गोरख शिंदे (सदस्य) ,ज्ञानेश्वर हौसराव साबळे (सदस्य) हे सर्वच जण गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत .

गावाचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असून गावात नवनवीन उपक्रम येत्या काळात राबवण्यात येणार आहेत .गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत असे लिंबेवाडी चे युवा सरपंच किरण चंद्रकांत फुंदे यांनी सांगितले .