Sushant Singh Rajput | “मृत्यूनंतर एक वर्ष भावाची आत्मा…”, अजूनही सुशांत सिंग राजपूतला बोलते त्याची बहिण?

Sushant Singh Rajput Sister: येत्या १४ जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला ४ वर्षे पूर्ण होत आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अद्याप उकलले नसले तरी त्याची बहीण सोशल मीडियावर न्यायासाठी याचना करत आहे. नुकतेच सुशांतची बहीण श्वेता सिंग (Shweta Singh) कीर्तीने तिचा भाऊ सुशांतबद्दल असे काही वक्तव्य केले आहे ज्याने तुम्हालाही धक्का बसेल. श्वेताचे हे वक्तव्य सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मला त्याची उपस्थिती जाणवते
सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput)  बहीण श्वेता सिंग कीर्तीने प्रतिका रावच्या पॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. सुशांतबद्दल बोलताना श्वेता म्हणाली- ‘मला अजूनही त्याची उपस्थिती जाणवते. आमचे खूप गोड नाते होते. जसं जुळ्या मुलांसोबत घडतं तसं.’

सुशांतला एअरपॉड सापडले
नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत श्वेता म्हणाली- ‘काही दिवसांपूर्वी मी माझे एअरपॉड्स कुठेतरी ठेवायला विसरले होते. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाहीत. मग मला वाटले की सुशांत माझ्याकडे आला आणि माझ्या कानात कुजबुजला – तुझे एअरपॉड पडद्यामागे आहेत. जा, खिडकीजवळ ठेवले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला एअरपॉड तिथेच सापडले. तो गेल्यावरही मला तो माझ्या बाजूलाच असल्यासारखा वाटतोय. मृत्यूनंतर एक वर्ष सुशांतची आत्मा त्रस्त होती’.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन