संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या

मुंबई :  पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी (Patra Chawl Land Scam)  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना अखेर 100 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.  त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याचं स्वागत केलं आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी संजय राऊत यांना जामीन (Sanjay Raut Bail) मिळाल्यानंतर टायगर इज बॅक अशा आशयाचं ट्वीट केलं. याशिवाय टीव्ही 9 मराठीसोबत संवाद साधत असताना   सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यामुळे आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवाय संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला दहा हत्तींचं बळ मिळतं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून वाघ पिंजऱ्यातून सुटल्याचं म्हटलं आहे.रोहित पवार यांनी 12 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओत एका पिंजऱ्यातून एक वाघ मोठ्या रुबाबात झेप घेतो आणि  चालू लागतो असं या व्हिडीओत दिसतं. या व्हिडीओ पोस्टवर सत्यमेव जयते अशी कॅप्शन देण्यात आली आहे.