Facebookने एकाच दिवशी 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले; ‘हे’ आहे मुख्य कारण 

नवी दिल्ली –  फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची (Facebook, WhatsApp and Instagram) मूळ कंपनी असणाऱ्यामेटा प्लेटफॉर्म्स इंकने  त्यांच्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीच्या 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली. चुकीच्या निर्णयांमुळे महसूल बुडाल्याचे कारण त्यांनी दिले.

मार्क म्हणाला, ‘आज मी मेटाच्या इतिहासात घेतलेले काही कठीण निर्णय शेअर करणार आहे. आम्ही आमच्या संघाचा आकार सुमारे 13% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 11 हजारहून अधिक हुशार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत. आम्ही खर्चात कपात करून अधिक कार्यक्षम कंपनी बनण्यासाठी पावले उचलत आहोत.(Facebook lays off 11,000 employees in a single day; ‘This’ is the main reason)

मार्क झुकेरबर्गने देखील प्रभावित कर्मचार्‍यांबद्दल खेद व्यक्त केला आणि निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेतली तसेच कंपनी इथपर्यंत कशी पोहोचली. त्यांनी लिहिले, ‘मला या निर्णयांची जबाबदारी घ्यायची आहे आणि आम्ही येथे कसे पोहोचलो. मला माहित आहे की हे प्रत्येकासाठी कठीण आहे आणि ज्यांना माझ्या या निर्णयाचा फटका बसला आहे त्यांच्यासाठी मी विशेषतः दिलगीर आहे.

दरम्यान, मंगळवारी फेसबुकची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग खूप निराश होते. ही जी कर्मचारी कपात होत आहे. त्याला मीच जबाबदार असल्याचा दावा झुकरबर्गने केला. कंपनी झपाट्याने प्रगती करेल, या आशेवर अनेक लोकांना कामावर घेण्यात आले. पण हा निर्णय आत्मघातकी ठरला. कंपनीने 11000 कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ केला. या कर्मचाऱ्यांना एका फटक्यात रस्त्यावर आणले.