Sushma Andhare | हिम्मत असेल तर पोलिसांचा अवमान करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करा, सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Sushma Andhare Slam Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) दिले आहेत. मात्र राज्यातील पोलिसांना कमी लेखणारे वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेते नितेश राणे यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होत नाही, असे म्हणत सुषमा (Sushma Andhare) अंधारे यांनी उपमुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे भिवंडीत बोलताना म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांचा एक आमदार जाहीरपणे बोलतो काय गुंडा गर्दी करायची असेल ते करा सागर बंगल्यावर आपला बाप बसला आहे. हे पाहून नारायण भाऊंना काय वाटत असेल की पोरगाच म्हणतो माझा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने धमकी दिली जात आहे. पोलिस व्हिडिओ बनवून बायकांना दाखवतील, हे गृहखात्याच्या खाकी वर्दीचा अपमान आहे. नितेश राणे पोलिसांना खुले चॅलेंज करतात परंतु त्याची इतकी दहशत आहे की एकही पोलीस कर्मचारी त्यांच्या विरोधात तक्रार करत नाही. पोलिस खात्यातील सर्व कर्मचारी गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालक म्हणून बघत असतात आणि या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पाहिजे, परंतु असं होत नाही. परिणामी पूर्वी निर्जन ठिकाणी घटना घडत होती. परंतु, आता थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार होतो म्हणजेच पोलिसांचा धाकच उरलेला नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी