Maratha Reservation : जरांगे पाटलांचं आम्हाला देणं-घेणं नाही,आमच्या अस्मितेला हात लावल्यास…; Sunil Kedar आक्रमक 

Maratha Reservation –  राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या नव्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

अशातच काँग्रेस नेते सुनील केदार(Congress leader Sunil Kedar) यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणात कुणी ढवळाढवळ करत असेल, तर मान्य करणार नाही, असं सुनील केदार यांनी म्हटलं. जरांगे-पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. त्याबाबत प्रश्न विचाल्यावर सुनील केदार यांनी म्हटलं, “जरांगे पाटलांचं आम्हाला देणं-घेणं नाही. आंदोलनापेक्षाही आक्रमक भूमिका आम्ही घेऊ. आमच्या अस्मितेला हात लावल्यास सहन करणार नाही.”

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सुनील केदार म्हणाले, “आठ-दहा दिवसांपासून कुणबी समाजाबद्दल उल्लेख होत आहे. कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणात कुणी ढवळाढवळ करत असेल, तर मान्य करणार नाही. समाजाच्या अस्मितेला कुणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर देऊ. तसेच, कुणबी समाजाबद्दल राजकारण केल्यास हाणून पाडू.”

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन