कधी आणि कुठे पाहू शकता IPL Auction? फ्रँचायझींच्या पाकिटातील शिल्लक रक्कमही घ्या जाणून

IPL Auction: पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींचे संपूर्ण लक्ष जगप्रसिद्ध टी20 लीग इंडियन प्रीमियर लीगकडे लागले आहे. आज कोची येथे आयपीएलच्या आगामी हंगामाचा मिनी लिलाव रंगणार आहे. हा लिलाव सुरू होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. लिलावात 10 फ्रँचायझी 400 हून अधिक खेळाडूंवर बोली लावतील. या लिलावात काही नवे सितारेही उतरले आहेत, तर काही अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. मिनी लिलावापूर्वी कधी, कुठे, किती वाजता या लिलावाची सुरुवात होईल? किती खेळाडूंनी लिलावात आपले नाव नोंदवले? आणि त्यांपैकी किती जणांची निवड होईल? अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ…

1. आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार आहे?
इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव होत आहे. हा लिलाव 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. यावेळी कोचीमध्ये लिलाव होत असून, दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.

2. आयपीएल लिलावात किती संघ, खेळाडू सहभागी होतील?
आयपीएलचे सर्व 10 संघ यावेळी सुमारे 405 खेळाडूंसाठी बोली लावतील. हा एक छोटा लिलाव आहे, अशा स्थितीत खेळाडूंकडे केवळ 87 जागा रिक्त आहेत. म्हणजेच संघ फक्त इतकेच खेळाडू विकत घेऊ शकतील. 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय, 132 परदेशी आणि 4 खेळाडू असोसिएट देशांचे आहेत.

3. लिलावात खेळाडूंची मूळ किंमत किती आहे?
१९ विदेशी खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे, तर 11 खेळाडूंची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे. मनीष पांडे, मयंक अग्रवाल यांच्यासह एकूण 20 खेळाडूंची मूळ किंमत 1 कोटी रुपये आहे.

मूळ किंमत 2 कोटी असलेले खेळाडू: टॉम बॅंटन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, कॅमेरॉन ग्रीन, ट्विस हेड, ख्रिस लिन, केन विल्यमसन, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, रिले रोसो, रॅसी व्हॅन डर डुसे, जेसन होल्डर, निकोलस पूरन

मूळ किंमत 1.5 कोटी असलेले खेळाडू: शॉन अॅबॉट, रिले मेरेडिथ, जे.जे. रिचर्डसन, अॅडम झम्पा, शाकिब अल हसन, हॅरी ब्रूक, विल जॅक्स, डेविड मलान, जेसन रॉय, शॅफर्न रदरफोर्ड, नॅथन कुल्टर-नाईल

मूळ किंमत 1 कोटी असलेले खेळाडू: मयंक अग्रवाल, मनीष पांडे, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, मोईसेस हेन्रिक्स, अँड्र्यू टाय, जो रूट, ल्यूक वुड, मिचेल ब्रेसवेल, काइल जेम्सन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डिरेल मिशेल, हेनरिक क्लासेन, तब्रायझन, कुसल परेरा, रोस्टन चेस, राखीम कॉर्नवॉल, शाई होप, डेव्हिड वेस

4. कोणत्या संघात किती पैसे शिल्लक आहेत?

1. मुंबई इंडियन्स – 20.05 कोटी (12 स्लॉट)
2. चेन्नई सुपर किंग्ज – 20.45 कोटी (9 स्लॉट)
3. दिल्ली कॅपिटल्स – 19.45 कोटी (7 स्लॉट)
4. गुजरात टायटन्स – 19.25 कोटी (10 स्लॉट)
5. कोलकाता नाइट रायडर्स – 7.05 कोटी (14 स्लॉट)
6. लखनऊ सुपर जायंट्स – 23.35 कोटी (14 स्लॉट)
7. पंजाब किंग्स – 32.2 कोटी (12 स्लॉट)
8. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – 8.75 कोटी (9वा स्लॉट)
9. राजस्थान रॉयल्स – 13.2 कोटी (13 स्लॉट)
10. सनरायझर्स हैदराबाद – 42.25 कोटी (17 स्लॉट)

5. आयपीएलचा मिनी लिलाव लाईव्ह कुठे पाहू शकतो?
आयपीएलचा मिनी लिलाव यावेळी दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. एकीकडे हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर दाखवले जाईल आणि दुसरीकडे डिजिटलवर Jio Cinema अॅपवर दिसेल.