Eknath Khadase यांनी केलेलं ‘ते’ कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला डाका – महाजन

Girish Mahajan Vs Eknath Khadase – मंत्री गिरीश महाजन आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगू लागला आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटले आहे.

भोसरी प्रकरणात ही त्यांना दंड करण्यात आला असून, ही रक्कम त्यांना भरावीच लागणार आहे. तसेच खडसे यांच्या सर्व मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. तसेच, येत्या काही दिवसांत खडसेंनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाण्याची शक्यताही महाजनांनी वर्तवली आहे.

एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेऊन, त्यातून मुरूम उत्खनन केले. मात्र, त्यांनी रॉयल्टी भरली नाही, कोट्यवधी रुपयांचा मुरूम विकला, सगळा पैसा काळया मार्गाने घेतला. त्यांनी याबाबत रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. म्हणून त्यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याबाबत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे. 35 कोटी रुपयांचे दंड तातडीने त्यांस भरावा लागणार आहे. मात्र, त्यांनी तो भरला नाही म्हणून त्यांच्या सगळी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्ता लिलाव केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा