Sharad Mohol murder | ‘त्या’ दोघांपासून माझ्या जीवाला धोका; शरद मोहोळच्या पत्नीचा जबाब 

Sharad Mohol murder case :  शरद मोहोळ हत्या प्रकरणील मुख्य आरोपी गणेश मारणेला (Ganesh marane) अखेर अटक करण्यात आली आहे. पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.  दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे. तर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol)  यांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचं पुरवणी जबाबात म्हटलं आहे.

मोहोळची त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ५ जानेवारी रोजी कोथरूड (Kotharud) येथील सुतारदरा येथील घराजवळील गल्लीत त्याचा सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह काही जणांनी गोळ्या झाडून हत्या (Sharad Mohol murder) केली होती. दरम्यान, आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात पुरवणी जबाबात स्वाती मोहोळ यांनी केलेल्या दाव्याबाबत माहिती दिली.

गणेश मारणेला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी कमी व्हावी यासाठी आरोपीच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादावेळी आरोपीवर २००८ नंतर एकही दखलपात्र गुन्हा नसल्याचं सांगितलं. तसंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी साधे पुटपुटतसुद्धा नाहीत. आरोपीला कटात गोवण्यात आल्याचा दावा गणेश मारणेच्या वकिलांनी युक्तिवाद करताना केला.

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा