फर्ग्युसनमध्ये ‘मुक्तछंद’ या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयात(Ferguson College) 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ‘मुक्तछंद’ या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने यांनी कळविली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री(actress) विभावरी देशपांडे यांच्या हस्ते सोमवारी (6 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यानंतर ‘अभिनयाचे माध्यमांतर’ या परिसंवादात सिद्धार्थ बोडके, आस्ताद काळे, गौरी नलावडे, नील सालेकर सहभाग घेतील. आरती अंकलेकर-टिकेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता रंगणार आहे.

‘दृश्यकलांचे निर्मितीवेध’ या कार्यक्रमात यतिन पंडित (मूर्तिकला), पूजा निलेश (सुलेखन), चारुहास पंडित (व्यंगचित्र) यांचे सादरीकरण मंगळवारी (7 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता होणार असून, अरुणा ढेरे आणि अशोक नायगावकर या कविश्रेष्ठांची मुलाखत सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

‘बीजमातेचे सृजन’ ही राहीबाई पोपेरे यांची मुलाखत आणि ‘बंक लेक्चर्सचा सीलॅबस’ हे कार्यक्रम बुधवारी (8 फेब्रुवारी) अनुक्रमे सकाळी साडेदहा आणि सायंकाळी साडेसहा वाजता होणार सादर केले जातील.