२४ वर्षीय निर्मात्याने ४८ वर्षीय अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, आधी बहीण म्हणत होता मग…

नवी दिल्ली – अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या (Casting couch) घटनांना सामोरे जावे लागले आहे. यातूनच दक्षिण भारतीय अभिनेत्री चारमिलालाही (Actress Charmila) या प्रसंगातून जावे लागले आहे. 48 वर्षीय अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला.असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Indiaglitz शी केलेल्या संभाषणात, अभिनेत्रीने सांगितले की तिने अलीकडेच एका मल्याळम चित्रपटात नायिकेच्या आईची भूमिका साकारली आहे. त्याचे शूटिंग कालिकतमध्ये झाले होते. या चित्रपटाचे सर्व निर्माते तरुण होते, त्यांचे वय सुमारे 23-24 वर्षे असेल. सुरुवातीला तो अभिनेत्रीला चेची (मोठी बहीण) म्हणत. मात्र तीन दिवसांनंतर त्याने अभिनेत्रीच्या सहाय्यकाशी संपर्क साधला आणि सेक्सुअल फेव्हरसाठी (Sexual favor) 50 हजार देण्याची ऑफर दिली.

अभिनेत्रीने स्वतःसारख्या एकल मातांना अशा तरुणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चारमिलाबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. लीड हिरोईन तिने 1991 मध्ये आलेल्या ओयलत्तम चित्रपटातून पदार्पण केले. तिने अनेक तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या अभिनेत्रीने 1995 मध्ये मल्याळम अभिनेता किशोर सत्यासोबत (Malayalam actor Kishore Sathya) लग्न केले होते. मात्र चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2006 मध्ये चारमिलाने दुसरे लग्न केले. या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे. त्याचे दुसरे लग्नही चालले नाही. 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता अभिनेत्री तिच्या मुलासोबत राहते.