मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे – पंकजा मुंडे

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असे असं म्हणतं त्यांनी विधानपरिषद निवडणुसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील.