आझम आणि सरफराजमधील वैर संपले! इमामच्या निकाहापूर्वी कव्वाली नाईटमध्ये एकत्र केला इन्जॉय

Babar Azam – Sarfaraz Khan Video : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) यांनी लाहोरमध्ये सहकारी इमाम उल हकच्या (Imam-ul-haq) निकाहपूर्वी ‘कव्वाली नाईट’ कार्यक्रमात हजेरी लावली. सरफराजने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि तो मस्त नाचताना दिसला आणि कव्वालीचा आनंद घेताना दिसला. तर बाबर आणि उस्मान कादिर त्याच्या शेजारी बसले होते. सरफराज जेव्हा ‘मेरा पिया घर आया’च्या तालावर नाचत होता, तेव्हा बाबरच्या चेहऱ्यावर हास्य होते. इमामचा निकाह आज म्हणजेच शनिवार 25 नोव्हेंबरला होणार आहे आणि लग्नाचे रिसेप्शन एक दिवस नंतर (रविवार, 26 नोव्हेंबर) होणार आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सरफराज गाण्यावर आनंदाने नाचत आहे. त्याचबरोबर बाबरही खूप एन्जॉय करत आहे. बाबर आणि सरफराजमध्ये २०१९ विश्वचषकानंतर सर्वकाही अलबेल नव्हते. बाबर पाकिस्तानच्या तिन्ही स्वरुपांच्या संघाचा कर्णधार बनला. तर सरफराजला हळूहळू कर्णधारपदावरुन बगल देण्यात आली आणि संघातूनही वगळण्यात आले. परंतु बाबरने अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. शान मसूदची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर शाहीन आफ्रिदी टी-20 संघाचे नेतृत्व करेल.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे