Navneet Rana | अमरावतीच्या वाघिणीवर भाजपने दाखवला विश्वास; नवनीत राणांना उमेदवारी घोषित

भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा (Navneet Rana) यांचं एकमेव नाव आहे.आता नवनीत राणा या आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत.

दरम्यान, नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. मी म्हटलं होतं लक्ष्मीच्या हाती कमळ असते ते मला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी मनापासून आभार मानते.

अमरावतीकरांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकला. मी मेहनत करणारी आहे. त्यामुळे मला हे फळ मिळालं. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जात आहे. तिथून भाजप प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?