Mumbai Indians | हार्दिक पांड्याचे ‘अच्छे दिन’ आले..! मॅच विनर फलदाज लवकरच मुंबई इंडियन्समध्ये परतणार

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघ पहिला विजय मिळवू शकलेला नाही. रोहित शर्माच्या जागी नवा कर्णधार हार्दिक पांड्यासह स्पर्धेत दाखल झालेल्या संघाने आतापर्यंतचे पहिले तीन सामने गमावले आहेत. यादरम्यान, कर्णधार पांड्या आणि संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे बाहेर असलेला टी20 चा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव तंदुरुस्त झाला असून लवकरच तो मुंबईच्या प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन करू शकतो.

सूर्यकुमार यादव परतल्यास मुंबईच्या ( Mumbai Indians) फलंदाजी फळीला ताकद मिळेल. सूर्यकुमार टी20 तील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असून एकहाती सामना बदलण्याची क्षमताही त्याच्यात आहे. तो दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकला आहे.

या मोसमात मुंबई इंडियन्स संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव (सुरुवातीच्या सामन्यांपैकी), इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष. चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती