राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर; मविआने घेतला मनसेचा धसका ? 

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा झंजावात पुन्हा एकदा पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या (MVA) विरोधात भूमिका घेतल्याने मनसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मशिदीवरचे भोंगे (Loudspeaker) उतरवण्याची घोषणा आणि पुण्यात (Pune) हनुमानाची महाआरती यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangaabad) जाहीर सभा घेणार आहेत. मात्र सभेला ५ दिवस बाकी असतानाही अद्याप पोलिसांची अद्याप परवानगी मिळालेली नाही.

परवानगी मिळवण्यासाठी मनसेचे नेते जोरदार प्रयत्न करत आहेत मात्र महाविकास आघाडीने राज यांचा चांगलाच धसका घेतल्याने या सभेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर आहे. औरंगाबादमध्ये पुढील १३ दिवसांसाठी जमावबंदी (Curfew) आदेश लागू झाला आहे. यामुळे मनसेला या सभेसाठी परवानगी मिळणार कि नाही याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान,  औरंगाबाद पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. या आदेशानुसार, शहरामध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असणार आहे.  त्यामुळे मनसे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.