ढाण्या वाघ 18 दिवसांनी परतला; तोच उत्साह, तोच जोश कायम

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte)  यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांनी तुरुंगातून सुटका होताच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच ‘हम है हिंदुस्थानी’, असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन भडकवल्याचा आरोप आहे.

या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्यांना 8 एप्रिलला रात्री १० वाजता अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली, तर एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली. अखेर आज जामिन मिळताच सदावर्तेंचा कारागृहाबाहेर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.