आगामी निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल; जयंत पाटलांना आशा

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.(The Election Commission has revoked the National Party status of the Nationalist Congress Party.)  त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसऱ्या बाजूला आयोगानं आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रतिक्रिया देत आयोगाच्या या निर्णयावर पक्षाची भूमिका मांडली. यात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस/समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही.असं ते म्हणाले.