भारताला ब्रिटन कडून लोकशाही शिकण्याची गरज नाही; रामदास आठवले यांचा शशी थरूर यांना टोला

मुंबई  – भारताला ब्रिटनकडून लोकशाही शिकण्याची गरज नाही.काँग्रेस नेते शशी थरूर यांना  भारताच्या गौरवशाली इतिहासाचे विस्मरण झाले आहे.अडीज हजार वर्षांपूर्वी भारतात भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्मातून जगाला सर्वप्रथम लोकशाहीचा मुलमंत्र बहुजन हिताय बहुजन सुखाय हा  दिला आहे. आज ही आदिवासी समुदयातून येणाऱ्या महामहिम द्रौपदी मुर्मु या देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे ब्रिटननेच भारताचा आदर्श घेतला पाहिजे आसे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संविधानाने देशातील विविधतेला राष्ट्रीय एकात्मतेत प्रवर्तित केले आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच इंदिरा गांधी या  देशाच्या पहिल्या  महिला प्रधानमंत्री बनल्या. अल्पसंख्यांक गणलेल्या  शीख समुदायातुन येणारे काँग्रेस नेते डॉ मनमोहन सिंग यांनी प्रधानमंत्री म्हणून  10 वर्षे कार्यकाळ  पूर्ण केला आहे.

राष्ट्रपतीपदी  डॉ ए पी जे अब्दुल कलाम,ग्यानी झेल सिंग,फाकरुद्दीन अली अहेमद  यांनी राष्ट्पती पद भूषविले होते.या पूर्वी रामनाथ कोविंद हे दलित समुदयातून आलेले नेते राष्ट्रपती झाले. तर आता आदिवासी समूहातून येणाऱ्या द्रौपदी मुर्मु या भारताच्या राष्ट्रपती आहेत.त्यामुळे भारतात सर्व समाज घटकांना समान  न्याय दिला जातो.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे भारत एकसंघ आहे. समता बंधुता राष्ट्रीय एकात्मता  देशाची मजबूत आहे.त्यामुळे अन्य देशाने भारताचा आदर्श घेतला पाहिजे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सबका साथ सबका विकास आणि सबका साथ घेऊन पुढे जात असताना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात काँग्रेस नेते शशी थरूर विष ओकत आहेत. त्यांनी आपले विधान मागे घ्यावे.ब्रिटन चे प्रधानमंत्री झालेले ऋषी सूनक यांचे अभिनंदन आम्ही करतो.ते भारतीय मूळ वंशाचे आहेत.मात्र ते आता ब्रिटन चे अधिकृत नागरिक आहेत.ब्रिटन चे नागरिक म्हणून ते ब्रिटन चे प्रधानमंत्री झाले आहेत. बहुमताने ते प्रधानमंत्री पदी ऋषी सूनक निवडून आले आहेत.

लोकशाहीतील बहुमताचे हे सूत्र  जगाला सर्व प्रथम भारतात भगवान बुद्धाने दिले आहे. या इतिहासाचा विसर शशी थरूर यांना पडला आहे असा टोला रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी शशी थरूर यांना लगावला आहे.