Amit Thackeray :  अमित ठाकरेंचा अपमान केल्याने महेश जाधवांना ‘प्रसाद’ दिला –  देशपांडे

Amit Thackeray :  मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव (Mahesh Jadhav)  यांनी केला. राज ठाकरे यांची टीम ही खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्याला अमित ठाकरे यांनी शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे.

महेश जाधव यांनी म्हटले की, मी माथाडी कामागारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडून राजगड या कार्यालयात मारहाण करण्यात आली. मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला. आपण पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण, राजगड कार्यालयात आपण काही माथाडी कामगारांसह गेलो. त्यावेळी माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी आपल्याला शिविगाळ केली आणि एका भारदस्त वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सहा टाके लागले असल्याचे जाधव यांनी म्हटले.

दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधवांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं.  त्यावेळी महेश जाधवांनी त्यांना उलट सुलट उत्तरं दिली. त्यांनी ज्या शब्दात अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला.

देशपांडे म्हणाले की, 20 वर्षे महेश जाधव हे राज ठाकरेंसोबत काम करतात. गेल्या चार पाच वर्षांपासून ते अमित ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत, वेगवेगळ्या विषयांवर बैठकी घेतात. मग 20 वर्षानंतर त्यांना आता का जाणीव झाली. महेश जाधव यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. महेश जाधवांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी मारहाण केली, माथाडी कामगार नेते महेश जाधवांचा आरोप