सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली; राज्यसभा निवडणुकीत आणखी एका उमेदवाराची एन्ट्री

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha elections) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज विजय मिळवतील असा दावा केला जात आहे.

या निवडणुकीत आता भाजपसह सर्वच पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटूरे (Rashtriya Kisan Bahujan Party President Arun Niture) यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, एकाबाजूला या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची चर्चा सुरु असताना अरुण निटूरे यांनी आपणास मतदान करणाऱ्या आमदारांना चक्क सफारी गाडीची (Safari car) ऑफर दिली आहे.

सर्व आमदारांनी, सर्व पक्षांनी मला सहकार्य करावं. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आण संसदेत पाठवावं. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. मला जर संसदेत पाठवलं तर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करता यावं म्हणून सफारी गाडी देऊन मदत करु शकतो. हे लालच नाही तर कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना सहकार्य करु याची हमी देतो, असं अरुण निटूरे यांनी म्हटलं.