जाड्या आणि रड्या… The Kerala Story फेम अदा शर्मा हिने गायली शाळेत शिकवलेली मराठी कविता

‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. अदाच्या अभिनयाबरोबरच तिच्या मराठी कवितांचा वेगळाच चाहतावर्ग आहे. ती सातत्याने मराठी कविता म्हणतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा शाळेत शिकवलेली एक मराठी कविता गाऊन दाखवली आहे.

जाड्या आणि रड्या अशा या कवितेचे नाव आहे. अदाने अतिशय गोंडस रिऍक्शन देत ही कविता गायली आहे. अदा शर्मा कविता पोस्ट करत म्हणाली, ‘इडली आणि चवळी चटक नंतर लोकांच्या मागणीवरून मी शाळेत शिकलेली दुसरी मराठी कविता…कसं वाटलं?’ मॅगझिनच्या कव्हर शूटच्या लंच ब्रेक दरम्यान अदा शर्मा हिने व्हिडीओ शूट केला आहे. चाहत्यांना देखील अदा शर्मा हिने गायिलेली कविता फार आवडली आहे.