The Kerala Storyला विरोध वाढला; चित्रपटगृहांच्या मालकांनी घेतला मोठा निर्णय
The Kerala Story: The Kerala Story विरोधात सुरू असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटाला मोठा पाठिंबा मिळत आहे, मात्र तामिळनाडूमध्ये चित्रपटाविरोधात सुरू असलेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता या चित्रपटाला वाढता विरोध पाहता या चित्रपटाचे प्रदर्शन तामिळनाडूमध्ये थांबवण्यात आले आहे.
तामिळनाडूमधील नाम तमिलार कच्ची (NTK) ने शनिवारी चेन्नईमध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या रिलीजला विरोध केला. नाम तमिलार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्कायवॉक मॉलजवळील चेन्नई अण्णा नगर आर्च येथे निर्माते, अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. हे बघून थिएटरमालकांनी घाबरून कायदा सुव्यवस्थेचे कारण देत राज्यभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे थांबवले आहे.
सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित ‘द केरळ स्टोरी’मध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दुसऱ्या बाजूला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही संघ परिवारावर ‘जातीयवादाची विषारी बीजे पेरून’ राज्यातील धार्मिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.