धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेहमीचीच भूमिका आहे – मुळीक

पुणे : वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू धर्माच्या पवित्र परंपरांबाबत संभ्रम निर्माण करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा आमदार अमोल मिटकरी यांचा शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

मुळीक म्हणाले, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (congress) पक्षाची नेहमीचीच भूमिका आहे. त्याच भूमिकेतून आज मिटकरी यांनी विकृत मनोवृत्तीतून आक्षेपार्ह विधान केले आहे. पवित्र परंपरांवर टीका करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. परंतु महविकास आघाडी सरकारला सर्वच पातळीवर येत असलेले अपयश झाकण्यासाठी वादग्रस्त विधाने करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ब्राम्हण संघटनेने केलेल्या आंदोलनाला समोरासमोर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला. या भ्याड कृत्याचा शहर भाजप निषेध करीत आहे. दहशत निर्माण करण्याच्या राष्ट्रवादीचे कृत्य भ्याडपणाचे आहे. जातीभेद करणारे कोणतेही कृत्य पुणेकर खपवून घेणार नाहीत.