पैसे सगळ्याकडे असतात, मात्र दातृत्वाची दानत असावी लागते – यशोमती ठाकूर

नवी मुंबई : पैसा सगळ्याकडे असतो, मात्र दातृत्वाची दानत सगळ्याकडे नसते, त्यामुळे चांगले काम करण्याची दातृत्वाची दानत असावी लागते. तेव्हाच कुठे मानवतेचे।होईल. मानवतेचे हे काम अविरतपणे चालले पाहिले, तरच जगण्याला अर्थ राहील. अशा भावना महिला व बाल विकास मंत्री तथा श्री गाडगे महाराज मिशन (Shree Gadge Maharaj Mission), मुंबईच्या अध्यक्षा ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केल्या. श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज धर्मशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते नवी मुंबई खारघर येथे संपन्न झाले. यावेळी ॲड. यशोमती ठाकूर बोलत होत्या.

आज एका सुंदर कौटुंबिक सोहळ्यात।सहभागी होऊन मला आनंद झाला. गाडगे महाराज मिशन, मुंबई गाडगेबाबांच्या विचाराने काम करीत आहे, आता आम्ही या धर्मशाळेवर थांबणार नाही तर पुढे या संख्येत वाफह करू, सरकार म्हणून पण यासाठी सहकार्य राहील. राष्ट्र संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या भूमीत जन्मलो हे आमचं भाग्य आहे. उज्वला हावरे यांनी घेतलेले व्रत मानवतेचे आणि मानव कल्याणाचे आहे.

ज्यावेळी आपल्या देशात कोविड काळात एकीकडे रुग्णालये, रुग्णवाहिका, ऑक्सिजन अशा गोष्टी सुरू होत्या, पण आज मात्र भोंगे, आरती-आजण, हिंदू-मुस्लिम या नको त्या गोष्टी सुरू आहेत. अशीही टिप्पणी केली.

आज मानवतेची इमारत खऱ्या अर्थाने उभी करू शकलो.- उज्वला सतीश हावरे (Ujjwala Satish Hawre)

उज्वला सतीश हावरे या बोलताना म्हणाल्या की, देव माणसात पाहायला हवा, त्यासाठीच या धर्मशाळेच्या माध्यमातून दृढ संकल्प सत्यात उतरला. आपल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा देताना मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व नातेवाईक यांची सत्य घटना त्यांनी कथन केली. मात्र आज आम्हा सगळयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. एवढ्या इमारती उभ्या करताना आपण आज मानवतेची व मानव कल्याणाची इमारत खऱ्या अर्थाने उभी करू शकलो.
कै. सतीश हावरे यांचे कार्य पुढे नेता आले आणि याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ॲड. यशोमती ठाकूर यांना धन्यवाद दिले.

धर्मशाळा उभारून प्रेरणादायी समाज उपयोगी कार्य केले – आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur)

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आज प्रेरणादायी दिवस आहे, आपण धर्मशाळा उभारून जे प्रेरणादायी समाजउपयोगी कार्य सुरू केले आहे, त्याचा इतर मंडळी आदर्श घेतील. गाडगेबाबांचा आदर्श घेऊन आपण मिशनचे काम कौतुकास्पद आहे. मिशनच्या अध्यक्ष ॲड. यशोमती ठाकूर बोल यांचे अभिनंदन केले. तसेच ठाकूर यांच्या माध्यमातून दहापटीने हे कार्य वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील उद्योजिका आणि हावरे इंजिनियर्स अॅण्ड बिल्डर्स प्रा.लिच्या चेअरपर्सन उज्वलाताई सतीश हावरे यांनी कै. सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ शारदा सदन ही वास्तू श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई या संस्थेस रुग्णसेवेसाठी विनामूल्य उपलब्ध केला याबद्दल त्यांना ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खारघरमधील सेक्टर नं. २० येथील शारदा सदन या वास्तूमध्ये श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित श्री गाडगे महाराज धर्मशाळेचा शुभारंभ महिला व बाल विकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशन, मुंबईच्या अध्यक्षा ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते संपन्न झाला.