शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही; रक्षा खडसे यांचा आक्रमक पवित्रा

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्यावर शनिवारी शिवसैनिकांकडून पुणे महापालिकेच्या आवारात भ्याड  हल्ला (Attack in the premises of PMC )  केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्या काही साथीदार यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्याबाबत अनेकांनी विवेकवादी भूमिका घेवून या घटनेचा निषेध नोंदवला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे सोयीचे मौन बाळगले आहे. दरम्यान, आता  सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात सध्या चुकीचं राजकारण सुरु आहे. किरीट सोमय्या यांना पुण्यात ज्या प्रकार खाली पडून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कार्यकर्ते दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे. एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना पुण्यामध्ये ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आहे आणि त्यांचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतलं जाणार नाही असं  खडसे यांनी म्हटले आहे.