एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी; शरद पवार गटाचा दावा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे (NCP Chief Spokesperson Mahesh tapase) यांनी म्हटले की महाविकास आघाडी असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेला बंड हा विकास कामाला निधी मिळत नसल्याच्या कारणामुळे करण्यात आला नव्हता तर वैयक्तिक कारणामुळे करण्यात आला होता. हे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांना शिंदे फडणवीस सरकार मध्ये अर्थ मंत्रालय देण्यात आल्याने स्पष्ट झाले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना विकास कामासाठी निधी देण्यात येत नव्हता म्हणून मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षातून 40 आमदार बाहेर पडत सरकारचा पाठिंबा काढला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्येच उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून अजित पवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाला की एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या सर्व आमदारांनी केलेला बंड हा वैयक्तिक कारणासाठी होता. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अर्थ व नियोजन खात दिल आहे. त्यामुळे आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा आता उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांच्यासमोर जावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून करण्यात आलेले आरोप आता निराधार झाले आहे. जो बंड करण्यात आला होता तो वैयक्तिक कारणामुळे करण्यात आले होता यावरून स्पष्ट झाले आहे असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.