टी20 विश्वचषकात रोहित शर्माच असेल भारताचा कर्णधार, जय शाहची घोषणा; उपकर्णधाराचे नावही सांगितले

T20 World Cup 2024: रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2024 ( T20 World Cup 2024) मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ही घोषणा केली आहे. बुधवारी राजकोट येथे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संघाच्या उपकर्णधाराचीही निवड केली. शाह म्हणाले की, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आगामी विश्वचषकात संघाचा उपकर्णधार असेल.

यावेळी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव बदलण्याची घोषणाही करण्यात आली. या स्टेडियमचे नवीन नाव निरंजन शाह स्टेडियम असे असेल. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांच्या सन्मानार्थ हा बदल करण्यात आला आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील टीम इंडियाच्या कामगिरीवर बीसीसीआय सचिव खूश यादरम्यान जय शाह यांनी टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कपमधील कामगिरीबद्दलही सांगितले. सलग 10 सामन्यांमध्ये भारताच्या विजयावर त्यांनी आनंद व्यक्त केला. भारताच्या कामगिरीवर शाह खूश दिसत होते. खरे तर, गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. याआधी टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. शाह म्हणाले, “2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना आम्ही हरलो असला तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. भारताने सलग 10 सामने जिंकले आहेत. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी होईल. यावर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक ( T20 World Cup 2024) स्पर्धेत विजयाची नोंद करण्यात यशस्वी व्हा.”

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole