राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्या समन्वयाने झाला आहे – बावनकुळे

 मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या समन्वयाने झाला आहे. जनतेच्या विकासासाठी राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक खाते महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी दिली.

ते माध्यमांशी बोलत होते. भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे जी खाते आहेत त्यातून जनतेला दिलासा देण्याचे काम संबंधित विभागाचे मंत्री करतील असे सांगून बावनकुळे म्हणाले, मागील अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन तयार केला होता. यावेळी शिंदे-फडणवीस यांच्यासह अजित पवार एकत्र येतील व तिघे मिळून अर्थसंकल्प तयार करतील. आमचे सरकार रॉकेट सरकार आहे. उद्धव ठाकरे यांना ज्यांनी सोडलं, ते आमच्याकडे आले हे बेरजेचे राजकारण आहे.

निवडणुकीसाठी भाजपाचा ९० ट्क्के करण्याचा प्रयत्न आहे. ५१ टक्के मतदान मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ, जेवढी ताकद भाजपाचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात असेल तेवढीच ताकद शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारासंघात लावली जाईल.