प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू; बंद खोलीत आढळला मृतदेह

Pune – ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील (Pune) आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह (Dead Body) आढळला असून गेले 2 दिवस त्यांच्या घराचं दार बंद असल्यानं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

रविंद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या 1975 मधील मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. महाजनी यांनी 1997 यावर्षी – सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं.