नाशिकमधील सुफी धर्मगुरुच्या हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर; चौघांनी दिली गुन्हाची कबुली 

नाशिक – मुस्लिम धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती (Khwaja Syed Chishti) उर्फ सुफी बाबाची नाशिकमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा मुस्लिम धर्मगुरु मुळचाअफगाणिस्तानचा होता.  या बाबाच्या हत्येमुळे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एकच खळबळ उडाली होती.

सुरुवातीला ही हत्या धार्मिक वादातून (Crime News) झाल्याची चर्चा पसरली. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करत, या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर आरोपींनी या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली असून प्रॉपर्टीसाठी ही हत्या करण्यात असल्याचं समोर आलं आहे.

मुस्लीम अफगाणी धर्मगुरू जारिफ बाबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गफार खान, गणेश झिंजाट, रवींद्र तोरे, पवन आहेर या आरोपींना अटक केली आहे. तर आणखी दोन आरोपीचां पोलिसांकडून शोध सुरू आहे.