Empress Garden पुष्प प्रदर्शनातील आकर्षक फुलांच्या मांडणीचा आनंद जूनपर्यंत लुटता येणार

पुणे : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने आयोजित एम्प्रेस गार्डन (Empress Garden) फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 प्रदर्शनचे आयोजन 25 जाने. ते 28 जाने. 2024 या दरम्यान केले होते. पुष्प प्रदर्शनासाठी जी विविध पुष्पांची मांडणी केली होती तसेच विविध फुलांच्या रोपांची मांडणी केली होती, ती अद्याप तशीच पुष्प चाहत्यांसाठी ठेवण्यात आली आहे.

एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने (Empress Botanical Garden) आयोजित एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होत यावेळे काही पुष्प चाहत्यांना पाहता आले नाही त्यांच्यासाठी साधारण जून पर्यंत पुष्प प्रदर्शनात विविध फुलांच्या रोपांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती ती पाहता येणार आहे. तसेच यशा फुलांच्या आकर्षक रोपांचे फोटो किंवा त्यांच्यासोबत आपला सेल्फी काढता येणार आहे. जे प्रदर्शनाप्रसंगी येवू शकले नाही त्यांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी केले आहे.

अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात. ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अ‍ॅग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू