‘टीप टीप बरसा पाणी’ गाण्यावर तरुणाच्या डान्सने लावली आग, त्याच्या डान्सपुढे नोरा फतेहीही पडेल फिकी!

Boy Dance On Tip Tip Barsa Pani: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय-काय करतील याचा अंदाज लावता येत नाही. नोरा फतेही, उर्फी जावेद यांच्यासह गौतमी पाटील अशा महिला कलाकारांची सध्या सोशल मीडियावर तुफान क्रेझ आहे. या कलाकारांना मागे टाकण्यासाठी पुरुष सोशल मीडियावर अतरंगी प्रयोग करतानाही दिसले आहेत. अशाच एका पुरुषाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या तरुणाने चक्क साडी घालून टीप टीप बरसा पाणी या गाण्यावर डान्स केला आहे.

हा व्हिडीओ amit_the_shinning_star या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ लाख ९२ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. हा डान्स पाहून अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलंय. व्हिडिओत दिसते की, तरुणाने शॉर्ट ब्लाउज आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये तो टीप टीप बरसा पाणी या गाण्यावर अतिशय हॉट मुव्ह्स करताना दिसतोय. त्याचा डान्स पाहून अनेक इंस्टाग्राम युझर्सनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.