राज्यातून तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं

पुणे  – महाराष्ट्रामध्ये सध्या तरुण मुलींचं अचानक गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पोलीस प्रशासनावर यानिमित्ताने टीकेची झोड उठली आहे. याच मुद्यावरून सध्या विरोधीपक्ष देखील चांगलाच आक्रमक झाला असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप केला जात आहेत

दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेली 2016 ते 2020 या तीन वर्षांमधील आकडेवारी पाहिली की, बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण अधिक गंभीरपणे अधोरेखित होतं. भारतामध्ये महिलांचं त्यातही 18 ते 30 वयोगटातील महिलांचं हरवण्याचं प्रमाण भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे.

2020 साली म्हणजेच गेल्या वर्षी कोव्हिडच्या संकटात लॉकडाऊन असतानाही मुंबईत या वयोगटातल्या 1 हजार 857 तरुण महिला बेपत्ता झाल्या. त्याखालोखाल बेंगळुरू शहरातून 1हजार 580 तर अहमदाबादमधून 1 हजार 557 तरुण महिलांची बेपत्ता म्हणून नोंद झाली.