महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली उद्योजक पुनीत बालन यांची सदिच्छा भेट

Murlidhar Mohol Meets Puneet Balan : पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपला विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पुनीत बालन हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख आहेत. पुनीत बालन यांचे सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम आहे. पुण्यातील बहुतांश गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांसोबत बालन यांची नाळ जोडली गेली आहे. युवा वर्गात देखील बालन यांचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचा पुण्यातील जनतेशी प्रचंड मोठा जनसंपर्क आहे. तसेच त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध देखील आहेत. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील पुनीत बालन यांनी अनेक शाळा, महाविद्यालयांना मोठी मदत केलेली आहे. तर हजारो कुटुंबातील मुलांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येते. एकंदरीत त्यांच्या वलयाला समाज मान्यता असल्यामुळे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची घेतलेली भेट ही विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे. ‘कोरोना’ काळात योद्धा म्हणून मुरलीधर मोहोळ आणि पुनीत बालन यांनी हातात हात घालून मोठे काम केले होते.

पुनीत बालन यांची घेताना मुरलीधर मोहोळ यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जाते. मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेली पुनीत बालन यांच्याशी भेट ही राजकीय दृष्टीकोनातून देखील महत्वाची आहे. या भेटीला एक वेगळेच महत्व आहे. महायुतीच्या म्हणजेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ही भेट नक्कीच फायद्याची ठरणार आहे. यामध्ये शंका नाही.

पुण्याची निवडणुक ही तिरंगी होणार असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फाईट होणार आहे. पुनित बालन ग्रुप तर्फे दरवर्षी पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याला देखील खूप मोठा प्रतिसाद मिळतो. फ्रेंडशिप करंडकाशी हजारो तरुण जोडले गेलेले आहेत. ते सर्व तरुण पुनीत बालन यांचे चाहते आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी बालन यांची भेट घेतल्यामुळे आपोआपच त्या सर्व तरुणांचा मोहोळ यांनाच पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळेच आपला विजय सुकर करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुनीत बालन यांची भेट घेतली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत