मागील लोकसभा निवडणुकीत ‘या’ सेलिब्रेटींनी नशीब आजमावले होते; कुणी मिळवला विजय तर कुणाची झाली हार

Loksabha Election – 2019 साली लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक सेलिब्रेटींनी आपलं नशिब आजमावलं. लहान-मोठ्या पडद्यावर झळकलेले काही कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर काही क्रीडापटूंनीही राजकीय मैदानात उडी घेतली होती.मागील निवडणुकीत चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटींबाबत आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

मागील लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे (Amol Kolhe), स्मृती इरानी, सनी देओल (Sunny Deol), गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी विजय मिळवला होता तर उर्मिला मातोंडकर, जया प्रदा, प्रकाश राज यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशातील मथुरेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हेमा मालिनी पुन्हा एकदा खासदारपदी निवडून आल्या होत्या.

याशिवाय युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी खासदारकी मिळवली होती. याशिवाय सर्वात लक्षवेधी लढतीमध्ये काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. शेट्टींना सात लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली, तर उर्मिला यांच्या पदरात 2 लाख 41 हजार 431 मतं पडली.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली