‘कोणतीही बाई आली तर त्यावेळी सगळे उभे राहून बाईकडे बघायचो’

पटना – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी एका कार्यक्रमात असे वक्तव्य केले, ज्याची बरीच चर्चा होत आहे. नितीश कुमार म्हणाले की, आम्ही जेव्हा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकायचो तेव्हा मुली शिकत नव्हत्या. त्यामुळे आमच्या कोलेजात मुलीच नसायच्या.  काय परिस्थिती होती, खूप वाईट वाटत होतं. कोणतीही बाई आली तर त्यावेळी सगळे उभे राहून बाईकडे बघायचो. त्यावेळी ही परिस्थिती होती. आता बघा किती मुली इंजिनीअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकतात.

पाटणा येथील गांधी मैदानात मगध महिला महाविद्यालयाच्या ५०४ खाटांच्या G+7 च्या धर्तीवर बांधलेल्या महिमा वसतिगृहाचे उद्घाटन करण्यासाठी नितीश कुमार सोमवारी आले होते. यावेळी त्यांनी या गोष्टी सांगितल्या. मगध महिला महाविद्यालयात बांधलेले वसतिगृह राज्य सरकारने ३१.८ कोटी रुपये खर्चून बांधले आहे. या वसतिगृहात प्रत्येक मजल्यावर 18 खोल्या, 16 स्वच्छतागृहे आणि 12 स्नानगृहे आहेत. एका खोलीत तीन विद्यार्थिनींना राहण्यासाठी एक खोली आहे. कॅन्टीनसह विविध सुविधांचीही येथे काळजी घेण्यात आली आहे.