ओमिक्रॉनमुळे चिंता वाढत असताना लसींच्या प्रभावाबाबत आली ‘ही’ माहिती समोर

 नवी दिल्ली- ओमिक्रॉन या कोविड 19 च्या नव्या प्रकाराचे रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये रोज दुप्पट संख्येनं आढळत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. वर्षभरापेक्षा सध्या आपण वेगळ्या परिस्थितीत असल्यामुळे सर्वांनी घाबरून न जाता सतर्क आणि सावध राहण्याची गरज स्वामिनाथन यांनी व्यक्त केली.
या प्रकाराचा संसर्ग वाढत असला तरी सध्या जगातील 99% कोविड रुग्ण हे डेल्टा प्रकाराचेच आहेत असं ही त्या म्हणल्या. आतापर्यंत या प्रकाराचं संक्रमण गंभीर स्वरूपाचं नसलं तरी या टप्प्यावर WHO या प्रकाराच्या सौम्यतेविषयी काहीही सांगू शकत नाही तसंच या प्रकाराचा गंभीर रुग्ण न आढळल्यामुळे लस अजूनही प्रभावी असल्याचं त्या म्हणाल्या.
लसीमध्ये कोणतेही बदल न करता जास्त धोका असलेल्या नागरीकांपर्यंत लवकरात लवकर लस पोहोचवणं सध्या गरजेचं असल्याचं WHO चे आपत्कालीन संचालक माईक रायन यांनी स्पष्ट केलं आहे.