बोंबला : ‘राकेश रोशन चंद्रावर गेले तेव्हा…’, चांद्रयान-3 चे अभिनंदन करताना ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

Chandrayaan 3 Landing on Moon: संपूर्ण देश मिशन मून चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आनंद साजरा करत आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे यश हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ आहे. 23 ऑगस्टला चांद्रयानाने चंद्राच्या भूमीला स्पर्श करताच संपूर्ण भारतात जल्लोष सुरु झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूडपासून सर्वजण इस्रोचे अभिनंदन करत आहेत. शास्त्रज्ञांच्या मेहनतीला संपूर्ण भारत सलाम करत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मिशनसाठी इस्रोचे अभिनंदन केले, परंतु त्यांच्या एका चुकांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चंद्रावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगपूर्वी, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एका कार्यक्रमात इस्रोचे अभिनंदन केले आणि ते यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, 1984 च्या मिशनची कथा सांगताना त्यांनी अंतराळवीर राकेश शर्माऐवजी चित्रपट निर्माता राकेश रोशन यांना श्रेय दिले. वास्तविक, त्यांचा नावात गोंधळ झाला आणि राकेश शर्माऐवजी राकेश रोशनचे नाव घेतले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पश्चिम बंगालच्या लोकांच्या वतीने मी इस्रोचे अभिनंदन करते. याचे श्रेय शास्त्रज्ञांना मिळाले पाहिजे. राकेश रोशन जेव्हा चंद्रावर पोहोचले तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले की तिथून भारत कसा दिसतो?