हे तर सुडाचे राजकारण …; संजय राऊत यांच्यावर कारवाई होताच राष्ट्रवादीचे रडगाणे झाले सुरु

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्ट्राचाराच्या (Corruption) विरोधात ईडीने (ED)कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान,  खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं… नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यावर महेश तपासे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली अशी बातमी वाचली. काय चाललंय? असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केला आहे. सन २०१९ मध्ये सरकार बनवता न आल्याने भाजप सुडाचं राजकारण करुन महाविकास आघाडीचे बलशाली नेत्यांना टप्प्याटप्प्याने टार्गेट करत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

संजय राऊत सातत्याने भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर बोलत होते त्यामुळे त्यांची मालमत्ता व राहतं घर ईडीने जप्त केलं आहे. अशापध्दतीने सुडाचं राजकारण ईडीच्या माध्यमातून भाजप करत आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले. ईडीच्या अधिकार्‍यांवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपानंतर गृहविभागाने एसआयटी स्थापन करुन चौकशी सुरू केली होती आणि आज ईडीने खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली हा योगायोग आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.