दसरा मेळावा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे का? तृप्ती देसाई यांचा थेट सवाल 

मुंबई : राज्यात आज होणाऱ्या दसरा मेळाव्यांनी राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून काढलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Eknath Shinde and Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत.

बीकेसी मैदानात शिंदे समर्थक कार्यकर्ते सकाळपासूनच दाखल होऊ लागले आहेत. बीकेसी मैदानातला मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी शिंदेंनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट सुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी एक लक्ष्यवेधी पोस्ट केली आहे. यात त्यांनी दोन्ही गटांना चिमटा काढला आहे. त्या म्हणतात, अहो मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री ‘दसरा मेळावा’ म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे का? कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आमचा….. एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा सर्वसामान्यांची कामे करा असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.