जेएनयूमध्ये रामनवमीच्या दिवशी वाद; विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी 

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय विद्यापीठ असलेलं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आलं. रविवारी राम नवमीच्या दिवशी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडले. यात दोन्ही संघटनांतील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

विद्यापीठातील कावेरी वसतिगृहात राम नवमीची पूजा आणि मांसाहारी जेवणावरून वाद झाल्याचे परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे (जेएनयूएसयू) माजी अध्यक्ष एन साई बाला यांनी दावा केला आहे की, विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यापासून रोखण्यात आले होते. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

हा व्हिडिओ जेएनयूच्या कावेरी हॉस्टेलचा आहे. अभाविपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जेएनयू गोंधळाच्या वादावर विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करून काही अतिरेकी अपप्रचार करत असल्याचा आरोप केला. बन्सल यांच्या मते, प्रत्येकाला खाण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांनी सांगितले की काही विद्यार्थी रामनवमीला पूजा करत होते. डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. कोणावरही हल्ला झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.