“कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन”, उद्धव ठाकरेंचे मोदींवर टीकास्त्र

Jalgaon –ळगावच्या पाचोऱ्यामध्ये काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घराणेशाहीविरोधातील भूमिकेबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.

“आमचे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. मी घरी बसून सरकार चालविले, मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण करून करू शकणार नाही. मी घरी बसून केले म्हणून ही माणसे आज आलीत. घराणेशाहीवर तुम्ही बोलताय ना, मी फकीर आहे, असे सांगत आहेत. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. अरे कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन. म्हणून घराणे चांगले लागते”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.