‘हार्दिक पांड्याला ट्रोल करणं थांबवा अन्यथा…’, मुंबई इंडियन्सनं रोहित फॅन्सला दिला इशारा

Mumbai Indians Warns Fans: काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन हटवले असून त्याच्याजागी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची नियुक्ती केली आहे. मुंबई फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे रोहितचे चाहते खूप संतापले आहेत. मुंबईच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाखो चाहत्यांनी अनफॉलो करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही चाहत्यांनी मुंबई फ्रँचायझी आणि हार्दिकवर मर्यादा सोडून टीकाही केली. दरम्यान आता मुंबईने संघ आणि हार्दिकवर अश्लील टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

ट्रोलिंग थांबवण्यासाठी MI च्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे टॉक्सिक फॅन्सला ट्रोलिंग थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे. जर त्यांनी हार्दिंक पांड्याला ट्रोल करायचं थांबवलं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा थेट ईशारा देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

“आम्ही फॅन्सच्या प्रतिक्रियांचा आदर करतो. पण काही फॅन्स हार्दिक पांड्याला खूप जास्त ट्रोल करत आहेत. त्याच्या कुटुंबीयांवर टीका करत आहेत. अश्लिल भाषेत टीका-टिप्पणी करत आहेत. अशा सर्व टॉक्सिक फॅन्सला आम्ही ब्लॉक करत आहोत. अन् जर त्यांनी अशा प्रकारे ट्रोल करणं थांबवलं नाही तर कदाचित आम्हाला कायदेशीर मार्गानं जावं लागेल.” अशा आशयाचा इशारा या व्हिडीओद्वारे MI ट्रोलर्सला देण्यात आला आहे. हा व्हिडीओ ९ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर देखील कठोर शब्दात टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले