‘पंतप्रधान मोदींचा बांग्लादेशच्या लढाईत सहभाग, पण बाबरीच्या वेळी हिमालयात..’; ठाकरेंचा टोला

Mumbai –  गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये आरोप आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीद (Babri Masjid) पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला होता, यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

बाबरी पाडल्यानंतर इतकी वर्षे उलटली. त्यानंतर आता खंदकातले उंदीर बाहेर येत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी जो काही उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडणं आहे. असे बरेच उंदीर आता बाबरीच्या आठवणीतून बाहेर येत आहेत. ज्याला काही अर्थ नाही. जेव्हा बाबरी पडली तेव्हा तिथे आपले आत्ताचे माननीय पंतप्रधान हे त्यावेळी हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचंही नाव समोर आलं नव्हतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ते वक्तव्य चुकीचं म्हणजे साफ चुकीचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजप कडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. असं देखील ठाकरे यांनी म्हटले आहे.